ईस्टर्न पेरीफेरल द्रुतगती मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ईस्टर्न पेरिफेरल द्रुतगती मार्गा’चे उद्घाटन करण्यात आले.

हा मार्ग दिल्लीला गाझियाबाद, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा आणि पलवल यांच्याशी जोडतो.

135 किलोमीटर लांबीच्या या सिग्नल फ्री मार्गावर ताशी 120 किलोमीटरच्या गतीने वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. विक्रमी 500 दिवसात 11,000 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेला सहा पदरी मार्ग सर्व अत्याधुनिक संनियंत्रण व देखरेख सुविधांनी सुसज्जित आहे. उत्तरप्रदेश ते हरियाणा या दरम्यान चालणारी वाहतूक आता दिल्लीच्या बाहेरून होणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: