इब्राहिम मोहम्मद सोलिह

मालदीवच्या राष्ट्रपती पदासाठी अलीकडेच झालेल्या निवडणुकीत इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा विजय निश्चित झाला आहे. निवडणूक आयोगाच्या अस्थायी निकालानुसार सध्याचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना त्यांनी पराभूत करून आघाडी मिळवली आहे. सोलिह यांना ५८.३ टक्के मते मिळाली. तर यामीन यांना ४१.७ टक्के मते मिळाली आहेत.

मालदीव हे तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून साधारणपणे ८०० किमी. अंतरावर आहे.

मालदीव हा हिंदी महासागरातला एक उष्णकटिबंधी राष्ट्र असून ते 1000 पेक्षा जास्त कोरल बेटांपासून बनलेले आहे.

माले हे देशाचे राजधानी शहर असून मालदीवी रुफिया हे राष्ट्रीय चलन आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: