‘इपीएफओ’चा एक महत्वपूर्ण निर्णय

इपीएफओचा सदस्य एक महिन्यापर्यंत बेरोजगार राहिल्यास त्याला 75 टक्केपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देऊन कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (इपीएफओ) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पैसे काढल्यानंतरही सदस्य आपले खाते सुरू ठेऊ शकतो. तसेच इपीएफओ योजना -1952 च्या तरतुदीनुसार इपीएफओचा सदस्य दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास खातेधारक आपली उर्वरित 25 टक्के रक्कम काढून खाते बंद करू शकतो.

सध्याच्या स्थितीत कोणताही खातेधारक दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यानंतरच ही रक्कम काढू शकतो.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: