“इनोव्हेट इंडिया प्लॅटफॉर्म”

अटल इनोव्हेशन मिशन, निती आयोग आणि माय गव्ह तर्फे नवी दिल्ली येथे काल “इनोव्हेट इंडिया प्लॅटफॉर्म” चे उद्‌घाटन करण्यात आले.

अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर. रामानन आणि माय गव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुप्ता यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

देशभरातील नाविन्यता विषयक उपक्रमांची एकत्रित माहिती या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

हा मंच सर्व भारतीय नागरिकांसाठी खुला असून वापरकर्त्यांना मंचावर उपलब्ध नाविन्यपूर्ण उपक्रम पाहता येतील तसेच त्याबाबत मत प्रदर्शनही करता येईल.

नोंदणी करुन नागरिकांना https://innovate.mygov.in/innovateindia/. या मंचावर आपल्या, संस्थेच्या किंवा इतर कोणाच्या नाविन्यताविषयक उपक्रमांची माहिती या मंचावर देता येईल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: