‘इंडिया स्टेट-लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह’

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ‘इंडिया स्टेट-लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

1990-2016 या काळात भारतीयांमध्ये तीव्र हृदयरोग आणि आघात याच्या प्रमाणात 50% वाढ नोंदवली गेली आहे, जेव्हा की मधुमेहासह जगणाऱ्या लोकांची संख्या याच काळात 26 दशलक्ष वरून 65 दशलक्षवर पोहचलेली आहे.

गंभीर फुफ्फुसासंबंधी रुग्णांची संख्या 28 दशलक्षांवरून 55 दशलक्षांवर पोहचलेली आहे. तर कर्करोगामुळे होणारऱ्या मृत्युचे प्रमाण दुप्पट झाले आहे.

तीव्र हृदयरोगांची सर्वाधिक प्रकरणे पंजाबमध्ये व त्यापाठोपाठ तमिळनाडू येथे आढळून आली आहेत तर मधुमेहाच्या बाबतीत तमिळनाडू  व त्यापाठोपाठ पंजाब अग्रेसर आहे.

आघातचे प्रमाण (स्ट्रोक) पश्चिम बंगाल व त्यापाठोपाठ ओडिशामध्ये सर्वाधिक आहे.

कर्करोगाचे प्रमाण केरळमध्ये व त्यापाठोपाठ आसाम मध्ये सर्वाधिक आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: