‘इंजिनीअर्स डे’च्या निमित्ताने गुगलचा एम. विश्वेश्वरय्या यांना सलाम

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज ‘इंजिनीअर्स डे’ म्हणजेच ‘अभियंता दिवस’ साजरा करण्यात येत आहे. गुगलनेही या खास दिवसाचं औचित्य साधत एक खास डूडल तयार केलं आहे.

आपल्या कामातच परमेश्वर शोधण्याच्या मंत्रालाच जीवनाचा मंत्र मानणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये त्यांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक पूल दिसत असून, त्यावर गुगल ही अक्षरं स्पष्टपणे दिसत आहेत. अतिशय कलात्मकपणे आणि साजेसं असं हे डूडल गुगलकडून साकारण्यात आलं आहे.

विश्वेश्वरय्या –

भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेल्या भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचं जीवन अतिशय समृद्ध असं होतं.

१५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘इंजिनीअर्स डे’ म्हणून साजरा होतो.

विश्वेश्वरय्यांच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ धुळय़ात झाली.

१८८४ ते १९०८ पर्यंत ते मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक इंजिनीअर होते. तेव्हा तब्बल १६ महिने विश्वेश्वरय्या धुळय़ात होते.

अभियांत्रीकीशी संबंधित शिक्षण पद्धतीमध्येही त्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं आहं.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: