आसमा जहांगीर यांना मरणोत्तर संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार पारितोषिक

पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकील आसमा जहांगीर यांना मरणोत्तर 2018 सालचा संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. “संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार पुरस्कार” हा मानवाधिकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी  प्रदान केला जातो.

या पुरस्काराची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाच्या साधारण सभेकडून सन १९६६ मध्ये करण्यात आली होती व १९६८ साली पहिला “संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार पुरस्कार” प्रदान करण्यात आला.


आस्मा जहांगीर या संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार पारितोषिकाने सन्मानित होणाऱ्या चौथ्या पाकिस्तानी महिला ठरल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार पारितोषिकाने सन्मानित होणाऱ्या पाकिस्तानी महिला –

१) बेगम राअण लियाकत अली खान (1978)

२) बेनझीर भुट्टो (2008)

३) मलाला युसुफझाई (2013)

४) आसमा जहांगीर (2018)


2018 सालचा संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार पुरस्कार आस्मा जहांगीर यांच्यासोबतच पुढील तीन जणांना प्राप्त झाला आहे –

१) रिबेका ग्युमी (टांझानिया)

२) जोएनिया वापीचाना (ब्राझिलचे प्रथम स्वदेशी वकील)

३) फरंट लाइन डिफेंडर (आयर्लंडची मानवाधिकार संस्था)


10 डिसेंबर रोजी न्यूयॉर्क येथे जागतिक मानवाधिकार दिवशी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

आसमा जहांगीर -

Image result for asma jahangir

प्रसिद्ध वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचं फेब्रुवारी, २०१८ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं लाहोरमध्ये निधन झाले होते.

त्या पाकिस्तान सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.

मानवाधिकार क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी जहांगीर यांना ‘हिलाल-ए-इम्तियाज’,’ सितारा-ए-इम्तियाज’ हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मानव अधिकारासाठी काम करणाऱ्या आसमा जहांगिर यांना ‘युनेस्को’नेही सन्मानित केले होते.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: