आशियाई स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१६ अशी मात केली.

चायनीज तैपेईच्या खेळाडूने सुरुवातच आक्रमणाने केली. तिने दमदार स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिला गेम 21-13 असा जिंकला. या गेममध्ये सिंधूने कमबॅक करण्याचे प्रयत्न केले, परंतु जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताय त्झु यिंने 11-7 अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या गेममध्ये सिंधुकडून सुरेख खेळ झाला. पिछाडीवर पडूनही तिने कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी यिंगने हा गेम 21-16 असा जिंकून जेतेपद निश्चित केले.

आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: