‘आशियाई सांघिक स्नूकर अजिंक्यपद 2018’

दोहा (कतार) येथे खेळल्या गेलेल्या ‘आशियाई सांघिक स्नूकर अजिंक्यपद 2018’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेमध्ये भारताला रौप्यपदक प्राप्त झाले आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या बाबर मसिहा आणि मोहम्मद आसिफ यांनी भारताच्या पंकज अडवाणी आणि मलकित सिंगचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

ACBS आशियाई स्नूकर अजिंक्यपद ही आशियातली प्रमुख अ-व्यावसायिक स्नूकर स्पर्धा आहे.

1984 सालापासून ही स्पर्धा खेळली जात असून या स्पर्धेला आशियाई बिलियर्ड क्रिडा महासंघाकडून (ACBS) मान्यता आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: