आशियाई खेळ 2018 मधील भारताची कामगिरी

जकार्तामध्ये आशियाई खेळ 2018 च्या 11व्या दिवशी भारताने मिळविलेल्या पदकांची एकूण संख्या 54 एवढी राहली, ज्यात 11 सुवर्ण, 20 रौप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे.

11व्या दिवशी भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडीचे तसेच स्वप्ना बर्मन हिने हेप्टथॅलॉनमध्ये असे 2 सुवर्णपदके जिंकून दिलीत.

तब्बल 48 वर्षानंतर भारताला तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळालेले आहे.

“हेप्टथॅलॉनमध्ये सुवर्णपदक मिळवणारी स्वप्ना बर्मन ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.”

याव्यतिरिक्त, महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत दुती चंदने रौप्यपदक पटकावले.

टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या शरथ कमल व मनिका बत्रा या जोडीने भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

रिले संघाने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्ण, पुरुष संघाने रौप्यपदक मिळवले आहे.

त्याचबरोबर पुरुषांच्या १५०० मीटरमध्ये जिन्सन जॉन्सनने सुवर्ण, महिलांमध्ये चित्राला ब्राँझ मिळाले.

महिलांच्या थाळीफेकमध्ये सीमा पुनियाला ब्राँझपदक मिळाले. महिला रिले संघाने सलग पाचव्या एशियाडमध्ये सुवर्णयश मिळवले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: