आशियाई खेळांमध्ये राही सरनौबतला सुवर्णपदक

आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या राही सरनौबतने २५ मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

असा पराक्रम करणारी राही सरनौबत ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपलं अव्वल स्थान कायम राहिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडची प्रतिस्पर्धी खेळाडू नफस्वॅन यांगपाइबून हिने राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं.

अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला.

पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत १५ पदकांची कमाई केली असून यात ४ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

सुवर्ण पदक जिंकणाऱ्या या ४ खेळाडूंमध्ये कोल्हापूरच्या राहीचा समावेश आहे. राहीने २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात थायलंडच्या नफस्वॅन यांगपाइबूनला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले आहे.

राहीचं आशियाई स्पर्धेतील हे दुसरं पदक आहे. २०१४ मध्ये तिने याच क्रीडा प्रकारात कांस्य पदक कमावलं होतं. तर आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक कमावणारी राही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: