आशियाई क्रीडा स्पर्धा – 2018

8 वी आशियाई क्रीडा स्पर्धा ही प्रथमच जकार्ता व पालेमबांग (इंडोनेशिया) या दोन शहरांत 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2018 या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेत 45 देश सहभागी झाले होते.

18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 15 सुवर्ण, 24 रौप्य, 30 कांस्य मिळून एकूण 69 पदकांसह पदकतालिकेत आठव्या क्रमांकावर राहिला आहे.

या स्पर्धेच्या समारोप समारंभात भारताच्या ध्वजवाहकाची जबाबदारी ही महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपालवर होती. भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.

18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा मोटो “एनर्जी ऑफ एशिया” हा होता.

ही स्पर्धा दर चार वर्षांनी होते. 2010 मध्ये चीनमधील ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 14 सुवर्ण,17 रौप्य, 34 कांस्य मिळून 65 पदके मिळवली होती.

2022 साली चीनमधील हँग्झोऊ शहरात 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: