आर. प्रगानानंदा

आर. प्रगानानंदा याने इटलीमध्ये सुरु असलेल्या बुद्द्धीबळ स्पर्धेमध्ये लुका मोरोनेला पराभूत करून बुद्धिबळातील सर्वांत लहान ग्रॅंड मास्टर होण्याचा मान मिळवला आहे. हा किताब पटकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. इटलीमधील ऑर्टीसेई येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रगानानंदाने अतिशय सुंदर बुद्धिबळ खेळत इराणच्या आर्यन घोलामी याला पराभूत केले तर आठव्या फेरीत त्याने लुका मोरोनेवर मात केली.

प्रगानानंदाने वयाच्या 12 वर्षे, दहा महिने आणि 13 दिवसांचा असताना त्याने हा किताब मिळवला आहे. 1990 मध्ये युक्रेनचा सर्जे कर्जाकिन हा वयाच्या 12 वर्षे, सात महिन्यांचा असताना जगातील पहिला लहान ग्रॅंड मास्टर बनला होता. त्याने २००२ या वर्षी हा विक्रम रचला होता. जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन हा वयाच्या 13व्या वर्षी ग्रॅंड मास्टर झाला तर विश्वनाथ आनंदने हा किताब वयाच्या १८व्या वर्षी पटकावला.भारताचा सगळ्यात तरूण ग्रँड मास्टर असलेला परीमार्जन नेगी, ज्यानं हा किताब १३ वर्षे ४ महिन्याचा असताना पटकावला होता त्याला मागे टाकत प्रगानानंदाने भारतातील सर्वात लहान ग्रॅंड मास्टरचा सन्मान मिळवला आहे. 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: