आरोग्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे तीन भारतीय

जगप्रसिद्ध ‘टाइम’ या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये दिव्या नाग, डॉ. राज पंजाबी आणि अतुल गावंडे या तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे.

आरोग्य क्षेत्रातील चार विविध श्रेणींमध्ये या तिघांनीही केलेल्या कामकाजाची दखल घेण्यात आली असून, यामध्ये जनआरोग्य, उपचार, किंमत आणि तंत्रज्ञान यांचा समावेश होतो.


दिव्या नाग –

दिव्या नाग (वय 30) या ‘अॅपल’च्या आरोग्य सेवेसंदर्भातील विशेष प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालील शोधपथकाने तयार केलेले ‘रिसर्चकीट’ हे ओपन सोर्स ऍप डेव्हलपर डॉक्‍टर आणि संशोधकांसाठी लाभदायी असून, या मध्यमातून रुग्ण, तसेच वैद्यकीय माहितीचे शेअरिंग सहज शक्‍य आहे. याचा समावेश “ऍपल वॉच’मध्ये करण्यात आला आहे.


अतुल गावंडे –

अतुल गावंडे हे आरोग्य क्षेत्रातील मोठ्या भागिदारीचे नेतृत्व करतात, ना नफा-ना तोटा या तत्त्वावर ही सुरू असून, याचा लाभ अमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जे. पी. मॉर्गन या कंपन्यांमधील दहा लाख कर्मचाऱ्यांना होतो.


डॉ. राज पंजाबी –

राज पंजाबी यांनी दुर्गम भागांत आरोग्य सुविधा पोचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: