आयुष राष्ट्रीय संस्थांच्या परिषदेचे उदघाटन

देशातील आयुष संस्थांचा शैक्षणिक दर्जा, संशोधन, रुग्णालय सुविधांमध्ये दर्जात्मक बदल आणि या संस्थांना पथदर्शी संस्था म्हणून नावारुपाला आणण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्लीत आयोजन केले आहे.

ही परिषद 17 आणि 18 जुलै रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे होणार आहे.

परिषदेच्या उदघाटन सोहळ्याला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत आयुष सचिव वैद्य राजेश कोटे यांची उपस्थिती असणार आहे.

परिषदेत दोन दिवस विविध आरोग्य विद्यापीठांचे कुलगुरु, नामांकित संशोधन संस्थांचे संचालक, आयआयटी, डीएसटी, डीबीटी, युजीसी या संस्थांमधून सुमारे शंभर व्यावसायिक परिषदेत सहभागी होणार आहेत.

परिषदेदरम्यान भारतीय क्रीडा प्राधीकरण आणि आयआयटीसोबत परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: