आयर्लंडमधील गर्भपातबंदी उठणार

आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वमतामध्ये जनतेने गर्भपातावर बंदी घालणारी ८ वी घटनादुरुस्ती रद्द करण्याच्या बाजूने कौल दिला आहे.

आयर्लंडमधील ८ वी घटनादुरुस्ती: १९८३ मध्ये झालेल्या सार्वमतानुसार आयरिश राज्यघटनेमध्ये गर्भपातावर बंदी घालण्याची तरतूद असलेली ८ वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आईच्या पोटात असणाऱ्या भ्रूणाला आईइतकाच जगण्याचा मूलभूत हक्क आहे, हे यामागचे तत्व होते. या घटनादुरुस्तीमुळे आयर्लंडमध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करणे अशक्य झाले होते.

डॉ. सविता हलपन्नावर या भारतीय वंशाच्या महिलेला वैद्यकिय अहवालानुसार गर्भपात करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी गर्भपाताची परवानगी मागितली. पण आर्यलंडच्या कायद्यानुसार गर्भपात करणं हा गुन्हा होता. त्यामुळं त्यांना परवानगी नाकारण्यात आली. याच आजारपणात 28 ऑक्टोबर 2012 ला सविता यांचा मृत्यू झाला.

डॉ. सवितांच्या मृत्यूनंतर आयरिश जनता रस्त्यावर उतरली. तसंच इतर देशांमध्येही याबाबत निदर्शनं झाली. शेवटी सरकारला यावर सार्वमत घेणं भाग पडलं. 25 मे रोजी झालेल्या सार्वमतात 66 टक्के जनतेनं गर्भपाताचा कायदा रद्द करण्याची मागणी केली. शेवटी सरकारनं कायदा बदलला. आता नव्या कायद्यानुसार 12 आठवड्यांपर्यंतचा गर्भ काढून टाकण्याची परवानगी आयरिश महिलांना देण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: