आयडीबीआय बँकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित

भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) आयडीबीआय (IDBI) बँकेमधील भागीदारी 51 टक्‍क्‍यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

त्यामुळे आता आयडीबीआय बँकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित होणार आहे.

याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह देशभरात 13 नवी केंद्रीय विद्यालये सुरू करणे या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

परिणाम -

या संपादनामुळे ग्राहक, एलआयसी आणि बँकेला ताळमेळाचा व्यापक लाभ मिळेल.

एलआयसी आणि आयडीबीआय बँकेला मोठी बाजारपेठ, वितरण खर्चात घट आणि ग्राहक अधिग्रहण, अधिक कार्यक्षमता आणि परिचालनात लवचिकता तसेच परस्परांची उत्पादने आणि सेवा विकण्याच्या अधिक संधी मिळतील.

यामुळे एलआयसी आणि बँकेला आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत मिळेल. आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांना गृहकर्ज आणि म्युच्युअल फ़ंड यासारखी वित्तीय उत्पादने बाजारात आणण्यास मदत होईल.

तसेच बँकांना दारोदारी बँकिंग सेवा पुरवण्यासाठी 11 लाख एलआयसी एजंटांची सेवा मिळवण्याची संधी मिळेल. आणि ग्राहक सेवांमध्ये सुधारणा तसेच आर्थिक समावेशकता दृढ करण्याचीही संधी मिळेल.

कमी खर्चाच्या ठेवी संपादित करून आणि देय सुविधांमधून शुल्क उत्पन्नाद्वारे बँकांना लाभ होईल.

बँकेच्या रोकड व्यवस्थापन सेवेपर्यंत व्याप्ती वाढवण्याबरोबरच  बँकेच्या 1916 शाखांच्या माध्यमातून एलआयसीला बँक हमी प्राप्त होईल.(म्हणजे बँकांनी विमा उत्पादन विकले तर)

एलआयसीचे वित्तीय समूह बनण्याचे स्वप्न साकार होण्यात मदत मिळेल.

ग्राहकांना एकाच छताखाली वित्तीय सेवा उपलब्ध होतील आणि एलआयसी आयुर्विमाचा विस्तार अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: