आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तूसंग्रहालयात रुपांतर

* आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

* राज्य सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्रालयास सादर केलेल्या प्रस्तावानुसार, ही नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्‍स येथे किनाऱ्यापासून सात सागरी मैल अंतरावरील समुद्रात कॉंक्रीटची पायाभरणी करून स्थापित करण्यात येणार आहे.

* या नौकेवरील वस्तूसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तू, दृक्‌श्राव्य कार्यक्रम, सागरी क्षेत्राचा इतिहास प्रदर्शित करणारे आभासी दालनांची सुविधा असतील.

* या सर्व प्रकल्पासाठी प्राथमिक अहवालानुसार 852 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर तो राबविण्यात येणार आहे.

* आयएनएस विराट युद्धनौका मार्च 2017 मध्ये भारतीय नौसेनेतून निवृत्त झाली होती. सध्या ती नौसेनेच्या गोदीमध्ये (नेव्हल डॉकयार्ड) ठेवण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: