‘आदिवासी पर्यटन परिक्रमा’

पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत देशातल्या प्रथम ‘आदिवासी पर्यटन परिक्रमा’ (tribal tourism circuit) याचे उद्घाटन छत्तीसगड राज्यात करण्यात आले आहे. योजनेचा हा उद्घाटन झालेला दुसरा प्रकल्प आहे.

आदिवासी पर्यटन परिक्रमा –

या प्रकल्पात जशपूर, कुंकुरी, माइनपत, कमलेशपूर, महेशपूर, कुर्डार, सरोददादर, गंगरेल, कोंडागाव, नथैया नवागाव, जगदलपूर, चित्रकूट, तीर्थगड या 13 स्थळांचा समावेश आहे.


भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसाद (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि स्वदेश दर्शन योजना सन 2014-15 मध्ये सुरू करण्यात आली.


स्वदेश दर्शन –

देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे. या योजनेंतर्गत विकासासाठी पुढील 13 पर्यटन परिक्रमांची ओळख करण्यात आलेली आहे –

१. बुद्धीष्ट परिक्रमा

२. ईशान्य भारत परिक्रमा

३. सागरकिनारा परिक्रमा

४. हिमालय परिक्रमा

५. कृष्ण परिक्रमा

६. वाळवंट परिक्रमा

७. पर्यावरणीय परिक्रमा

८. वन्यजीव परिक्रमा

९. आदिवासी परिक्रमा

१०. ग्रामीण परिक्रमा

११. धार्मिक परिक्रमा

१२. रामायण परिक्रमा

१३. वारसा परिक्रमा.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: