आदिवासी जिल्ह्यांमध्ये ‘वन धन विकास’ केंद्रांची स्थापना

भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने देशभरात आदिवासी जिल्ह्यांमध्ये ‘वन धन विकास’ केंद्रांची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.14 एप्रिल 2018 रोजी बिजापूर (छत्तिसगड) मध्ये‘वन धन विकास’ केंद्राचा शुभारंभ करण्यात आला होता.

देशभरात अशी सुमारे 3000 केंद्रे दोन वर्षांत स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. सुरूवातीस हा उपक्रम 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या 39 जिल्ह्यांमध्ये राबवविला जाणार आहे.

योजनेनुसार, ट्रायफेड (TRIFED) आदिवासी भागात MFPच्या नेतृत्वाखाली बहुउद्देशीय वन धन विकास केंद्रांची स्थापना करण्यास मदत करणार आहे.

वन धन विकास केंद्र म्हणजे प्रत्येकी 30 आदिवासी MFP लोक असलेल्या 10 बचतगटांचा एक समूह आहे.या उपक्रमाद्वारे लाकूड-व्यक्तिरिक्त अन्य वनोत्पादनांच्या मूल्य शृंखलेत आदिवासींचा वाटा वर्तमानातल्या 20% वरून 60% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: