आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात समाविष्ट असलेल्या आठ प्रमुख उद्योगांचा वाटा 40.27 टक्के इतका आहे. आठ प्रमुख उद्योगांचा संयुक्त निर्देशांक जून 2018 मध्ये 129.8 इतका राहिला. जून 2017च्या तुलनेत तो 6.7 टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल ते जून 2018-19 मध्ये एकत्रित वाढ 5.2 टक्के होती.

कोळसा

जून 2018 मध्ये कोळशाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.5 टक्क्याने वाढले. तर एकत्रित निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.2 टक्क्यांनी वाढला.

कच्चे तेल

जून 2017 च्या तुलनेत जून 2018 मध्ये कच्च्‍या तेलाचे उत्पादन 3.4 टक्क्यांनी कमी झाले. तर एकत्रित निर्देशांक 2.4 टक्क्यांनी कमी झाला.

नैसर्गिक वायू

जून 2017 च्या तुलनेत जून 2018 मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन 2.7 टक्क्यांनी कमी झाले. तर एकत्रित निर्देशांक 0.4 टक्यांनी वाढला.

रिफायनरी उत्पादने

जून 2017 च्या तुलनेत जून 2018 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादन 12 टक्क्यांनी वाढले. तर एकत्रित निर्देशांक 6.6 टक्क्यांनी वाढला.

खते

जून 2017 च्या तुलनेत जून 2018 मध्ये पोलाद उत्पादन 4.4 टक्क्याने वाढले.

सिमेंट

जून 2017 च्या तुलनेत जून 2018 मध्ये सिमेंट उत्पादन 13.2 टक्क्याने वाढले.

वीज

जून 2017 च्या तुलनेत जून 2018 मध्ये वीज निर्मितीत 4 टक्के वाढ झाली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: