आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या (ISA) पहिल्या महासभेचे उद्घाटन

2 ऑक्टोबर 2018 रोजी दिल्ली-NCRच्या ग्रेटर नोएडा येथे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या (ISA)पहिल्या महासभेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

या परिषदेच्या बरोबरीने 5 ऑक्टोबर 2018 पर्यंत द्वितीय RE-INVEST आणि इंडियन ओशन रिम असोसिएशन एनर्जी मंत्रिस्तरीय बैठक देखील चालणार आहे.

आंतरराष्ट्रीय सौर युती –

पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामान्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.

ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था असून गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.

ISA 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे. आतापर्यंत 19 देशांनी याला स्वीकृती दिलेली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: