आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन – 1 ऑक्टोबर

दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन’ पाळला जातो. यावर्षी या दिनाचा “सेलिब्रेटिंग ओल्डर ह्यूमन राइट्स चॅम्पियन्स” हा विषय आहे.

आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिनी सन 2005 पासून दरवर्षी इंडिया गेटवर व्यापक जनजागृती कार्यक्रम ‘वॉकथॉन’ चे आयोजन केले जात आहे.

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था (NISD) आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारा गेल्या 14 वर्षांपासून वॉकथॉन हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या पदयात्रेत वयोवृद्ध आणि जेष्ठ नागरिकांप्रती त्यांचे अधिकार आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठीचा संदेश दिला जातो.

सध्या जगभरात 700 दशलक्षाहून अधिक लोक ६० वर्षापेक्षा अधिक वय असणारे आहेत. 2050 सालापर्यंत जगाच्या लोकसंख्येपैकी 20 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच 2 अब्ज लोक 60 किंवा त्याहून अधिक वयाचे असतील. त्यातच वयोवृद्धांची सर्वाधिक संख्या आशियात असेल आणि आफ्रिका सर्वात प्रमाणबद्ध वाढीस सामोरे जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: