आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन: 15 सप्टेंबर

दरवर्षी 15 सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दि पाळला जातो. यावर्षी हा दिन ‘डेमॉक्रसी अन्डर स्ट्रेन: सोल्यूशन्स फॉर ए चेंजिंग वर्ल्ड’ या विषयाखाली पाळला गेला.

2007 सालच्या राष्ट्रकूलच्या सर्वसाधारण सभेत या जागतिक लोकशाही दिनाची घोषणा झाली. सार्वत्रिक मानवाधिकारांची घोषणापत्राला या वर्षासोबतच 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच दिनी घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. घोषणापत्रात असे नमूद आहे की, “लोकांची इच्छा हीच सरकारच्या अधिपत्याचा आधार असेल.”

लोकशाही संदर्भात पार्श्वभूमी –

फनिर्नंड माकोर्स या फिलीपिनमधल्या हुकूमशहाची 20 वर्षांची सत्ता तिथल्या जनशक्ती क्रांतीदलाने उलथवून लावली, तेव्हा तिथल्या नव्या राष्टाध्यक्ष कोसाझोन अक्विनो यांच्या अध्यक्षतेखाली 1988 साली एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवली गेली होती. अस्तित्वात असलेल्या व नव्याने उदयास आलेल्या प्रजासत्ताक राज्याच्या तत्त्वपूर्ण नियमावलीची प्रतिष्ठना करणे हा या परिषदेचा हेतू होता. या परिषदेच्या कतार, दोहा येथे भरलेल्या सभेत लोकशाहीच्या हितार्थ राष्ट्रकुलाने पुढाकार घ्यावा याचा पुनरुच्चार झाला. पुढे 1997च्या सप्टेंबरमध्ये आंतर-लोकसभा संघटनेने लोकशाही मूल्याचा उद्घोष केला आणि राष्ट्रकूलाला जागतिक लोकशाही दिन जाहीर करावा लागला.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: