‘आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शांती परिषद’

‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषद’ दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस येथे आयोजित केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेस चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

देशातील बौद्ध स्थळांच्या पायाभूत सुविधा, येथील दळणवळणाची साधने, पाली भाषेतील बौद्ध साहित्य आदी विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे.


धम्मचक्र परिवर्तन सोहळयाचा कार्यक्रम नागपूर मधील दीक्षाभूमी येथे दरवर्षी आयोजित केला जातो.

या सोहळ्यासाठी बौद्ध धर्माचे जगभरातील अनुयायी मोठ्या संख्येने येतात.

यावेळी नागपूर परिसरातील बौद्ध स्थळांना तसेच ड्रॅगन पॅलेसला देखील हे अनुयायी भेटी देतात.

याचे औचित्य साधून या आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषदेचे आयोजन केले जात आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: