आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह २०१८

२३ ते २६ ऑगस्ट २०१८या चार दिवसीय ६ व्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह २०१८ चे आयोजन नवी दिल्ली व औरंगाबादमधील अजिंठा येथे करण्यात येत आहे. या परिषदेची थीम Buddha Path – The Living Heritage ही आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाची बौद्ध वारसा ठिकाणे आणि तीर्थस्थळे यांना चालना देण्याच्या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे व बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्या सहकार्याने हि परिषद आयोजित केली जात आहे.

जपान हा कॉन्क्लेव्हचा भागीदार देश आहे. या परिषदेत बांगलादेश, इंडोनेशिया, म्यानमार आणि श्रीलंकेसह 29 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या कॉन्क्लेव्हसाठी बौद्ध अभ्यागत, भिक्खू आणि १२ ते १५ बौद्ध राष्ट्रांमधील महावाणिज्य दूत (कौन्सुलेट जनरल) उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने त्यांच्यात व स्थानिक सहल आयोजकांमध्ये बैठका होणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील बौद्ध आकर्षणांवर प्रकाश टाकणारी सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह म्हणजे आपल्या देशातील बुद्ध वारशाच्या अंतरंगाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याऱ्या पर्यटन खात्याच्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बांधिलकीचे द्योतक आहे.

२०१८ या वर्षी पार पडत असलेली आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद हे या परिषदेचे सहावे आयोजन आहे. 

आजपर्यंत झालेल्या ५ आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदा पुढील ठिकाणी भरवल्या गेल्या आहेत -

फेब्रुवारी २००४ मध्ये नवी दिल्ली आणि बोधगया

फेब्रुवारी २०१० मध्ये नालंदा आणि बोधगया

सप्टेंबर २०१२ मध्ये वाराणसी आणि बोधगया

सप्टेंबर २०१४ मध्ये बोधगया व वाराणसी

ऑक्टोबर 2016 मध्ये सारनाथ/ वाराणसी आणि बोधगया

आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या 2018 च्या निमित्ताने बौद्ध टूरिझमला चालना देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी indiathelandofbuddha.in हे एक नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: