आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU

नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) दक्षिण आशिया क्षेत्र कार्यालय’ व ‘तंत्रज्ञान अभिनवता केंद्र’ यांची स्थापना केली जाणार आहे. यासंबंधी घोषणा दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहरात झालेल्या BRICSच्या दूरसंचार मंत्र्यांच्या चौथ्या बैठकीत करण्यात आली.


ITU दक्षिण आशिया कार्यालय भारतासोबतच अफगानिस्तान, बांग्लादेश, भुटान, इराण, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या 9 देशांनाही सेवा पुरविणार आहे, जेथे जगातली 24% लोकसंख्या राहते.


आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ  हा माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विशेष विभाग आहे.

17 मे 1865 रोजी ITU ची स्थापना करण्यात आली होती.

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे याचे मुख्यालय आहे.

193 देश आणि सुमारे 800 खासगी क्षेत्रातल्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्था ITU चे सदस्य आहेत.

1869 सालापासून भारत ITU चा सदस्य आहे आणि 1952 सालापासून ITU परिषदेचा नियमित सदस्यही आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: