अॅमेझॉनकडून ‘मोअर’ ची खरेदी

बिर्ला समूहातील ‘मोअर’ ही ५०० हून अधिक दालनांची शृंखला ४२०० कोटी रुपयांना खरेदी केली जाणार आहे.

अॅमेझॉन जागतिक गुंतवणूकदार कंपनी सामरा कॅपिटलच्या माध्यमातून हा व्यवहार करत आहे.

वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदीचा व्यवहार गेल्याच महिन्यात पूर्ण केला. थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून भारतातील किराणा क्षेत्राने याबाबत आक्षेप घेतला आहे.

असे असतानाही अॅमेझॉनने आदित्य बिर्ला रिटेलमधील ५१ टक्के हिस्सा घेण्याचे निश्चित केले आहे. तर सामराकडे उर्वरित ४९ टक्के भागीदारी असेल.

बिर्ला समूहातील ‘मोअर’ ही दालनसंख्येबाबत देशातील संघटित किरकोळ विक्री क्षेत्रातील चौथी मोठी नाममुद्रा आहे. फ्युचर समूहातील बिग बझार ही नाममुद्रा यात अव्वल असून रिलायन्स रिटेल आणि डी-मार्ट अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: