अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Image result for विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर

अमेरिकन अर्थतज्ज्ञ विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर या दोघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

नॉर्डस आणि रोमर या दोघांनी जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याबद्दल संशोधन केलं आहे. त्यांच्या या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात येणार आहे.

10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे एका औपचारिक कार्यक्रमात अमेरिकन अर्थतज्ज्ञ विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर या दोघांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या दोन्ही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्काराच्या रुपाने 90 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.35 कोटी रुपये) मिळणार आहेत.

विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर हे दोघे अर्थशास्त्रज्ञ अमेरिकेचे नागरिक आहेत.

नॉर्डस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे येल विद्यापीठातूनच घेतले आहे. त्यांनी प्रतिष्ठित मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: