अरपिंदर सिंग

झेक प्रजासत्ताक येथील ऑस्ट्राव्हा येथे सुरू असलेल्या 2018 IAAF खंडीय चषक (IAAF Continental Cup) या स्पर्धेत तिहेरी उडी क्रिडाप्रकारात भारताकडून अरपिंदर सिंगने कांस्यपदक पटकावले आहे. या प्रकारातील सुवर्णपदक क्रिस्टीन टेलर (अमेरिका) ह्याने तर रौप्यपदक ह्यूग्स फॅब्रिस झेंगो (बुरकीना फासो) ह्याने जिंकले.

या विजयासह तिहेरी उडी क्रिडाप्रकारात स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ (IAAF) –

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ ही अॅथलेटिक्सच्या खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे.

याचे मुख्यालय मोंटे कार्लो (मोनॅको) येथे आहे.

या महासंघाचे 215 संघ सदस्य आहेत.

याची स्थापना 17 जुलै 1912 रोजी स्टॉकहोम (स्वीडन) येथे झाली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: