अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन- 26 जून

26 जून 2018 रोजी ‘अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन’ जगभरात पाळला गेला.

२०१८ वर्षाचा विषय (थीम) –
‘‘प्रथम ऐका – मुलांना व तरुणांना निरोगी व ज्ञानी बनविण्यासाठी मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम त्यांचे ऐकून घ्या.’’ म्हणजेच

“लिसेन फर्स्ट – लिसेनींग टू चिल्ड्रेन अँड यूथ इज द फर्स्ट स्टेप टू हेल्प देम ग्रो हेल्दी अँड सेफ” ही होती.

पार्शवभूमी –

अमली पदार्थांच्या व्यसनाविरूद्ध ठोस पावले उचलावीत म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेत ७ डिसेंबर १९८७ रोजी २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि (त्यांची) अवैध वाहतूक विरोधी दिन, मानला जावा असा ठराव पारित झाला. २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अत्याचार विरोधी दिन म्हणूनही पाळला जातो.

प्रत्येक वर्षी २६ जून रोजी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या विघातक परिणामांविषयी जनजागृती केली जाते.

अमली पदार्थ आणि गुन्हे या विषयासंबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय  (UNODC) कार्यरत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: