अपघातांची सर्वाधिक संख्या तामिळनाडूमध्ये

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या रस्त्यांवरील अपघातांसंबंधी वार्षिक अहवालानुसार, रस्त्यांवरील अपघातात मृत्यूचे प्रमाण घटले असले आणि अशा घटनांची एकूण संख्या कमी असली तरीही, 2017 साली रस्त्यांवरील अपघातात पादचारी आणि सायकलस्वारांना सर्वाधिक धोका झाला होता.

अहवालाच्या ठळक बाबी –

2017 साली अपघातात 3.3%ची घट झाली आहे, ज्याप्रमाणे अपघातांची एकूण संख्या 4.64 लक्ष एवढी होती. त्यात 1.47 लक्ष लोकांचा मृत्यू झाला, जे की 2016 सालच्या तुलनेत 1.9% कमी आहे.

रस्ते अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्यांची संख्या 29.9%नी वाढून ती 20,457 पर्यंत पोहचलेली आहे तर 3,559 सायकलस्वारांचा मृत्यू झाला, जी की 37.7%ची वाढ आहे. रस्ते अपघातात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये पादचारी आणि सायकलस्वार यांचे एकत्रितपणे 16.2% एवढे प्रमाण आहे.

उल्लंघन झालेले चार वाहतूक नियम  व त्यामुळे असलेले मृत्यूचे प्रमाण –

१) वाहन चालवितांना मोबाइल फोनचा वापर (2.1%)

२) वेगात वाहन चालवणे (66.7%)

३) चुकीच्या बाजूने वाहन चालवणे (6.4%)

४) दारू पिऊन वाहन चालवणे (3.2%)


वरील अहवालानुसार,  तामिळनाडूमध्ये अपघातांची संख्या सर्वाधिक आहे, तर उत्तरप्रदेशात सर्वात जास्त मृत्यू झालेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: