अनुपम खेर यांचा ‘FTII’ अध्यक्षपदाचा राजीनामा

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (FTII) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, त्यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

‘व्यस्त वेळापत्रका’मुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदावर संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान होता, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII)

भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था ही महाराष्ट्राततील पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.

ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था असून ती सायलेक्ट ह्या जागतिक दर्जाच्या संस्थेशी संलग्न आहे.

इ.स. १९६० साली ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे व ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: