अक्षय उर्जा विषयक दिल्ली घोषणापञकाचा IORA कडून स्वीकार

दिल्ली NCR च्या ग्रेट नोएडा येथे २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हिंदी महासागर सागरीकडा संघटनेच्या (IORA – Indian Ocean Rim  Association) ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या शेवटी IORA  चे सभासद असलेल्या सर्व २१ देशांनी हिंद महासागर क्षेत्रात अक्षय उर्जा विषयक दिल्ली घोषणापञक स्वीकारले.

घोषणापञकातील महत्वाचे मुद्दे -

१) IORA च्या सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (IRENA) यासह सहकार्य करण्याचा निर्धार केला असून त्यानुसार ऊर्जा क्षेत्राविषयक माहिती आणि अनुभव सामायिक केले जाणार आहेत.

२) शिवाय IORA  आणि आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) यांच्या दरम्यान  एक सामंजस्य करार केला कि जो, सौर ऊर्जा क्षेत्रात संयुक्त क्षमता बांधणी कार्यक्रम, संशोधन आणि विकास कार्यावर केंद्रित आहे.

३) याव्यतिरिक्त, IORA  सदस्य देश आणि IRENA ‘ग्लोबल रिन्यूएबल एजन्सी ऍटलस’ चा विस्तार करणार आहे जो, जगातील सर्वात मोठा संयुक्त अक्षय स्रोताविषयी माहिती प्रकल्प आहे.

IORA – Indian Ocean Rim  Association 

या संघटनेची स्थापना मार्च १९९७ मध्ये झाली असून इंडोनेशिया देश हि परिषद आयोजित करणारा पहिला देश आहे.

IORA  मध्ये एकूण २१ सदस्य देश सहभागी असून ७ देश संवाद भागीदार स्वरूपातील आहेत.

या संघटनेतील सदस्य राष्ट्रे –

भारत, ऑस्ट्रेलिया, इराण, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, मोजांबिक, केनिया, श्रीलंका, टांझानिया, बांगलादेश, सिंगापूर, मॉरिशस, मादागास्कर, संयुक्त अरब अमिरात(UAE), येमेन, सेशेल्स, सोमालिया, कोमोरोस आणि ओमान.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: